मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली, दिवा, टिट‌वाळा येथे वाळू माफियांची २१ लाखाची वाळू उपशाची सामग्री नष्ट

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटातर्फे रविवारी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहेत. तसेच या वक्तव्यांमुळे शिंदे असंतोष निर्माण होईल असेही नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्जे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, समालोचक सचिन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader