ठाणे– पनवेलहून जयपूर येथे लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या ट्रेलर चालकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पत्रकारांचा समावेश असून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रविण जाधव असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, संजय तिवारी आणि हरेंद्र गौतम अशी दोघे पत्रकारांची नावे आहेत. बाबु शेख असे एका आरोपीचे नाव असून अद्याप दोन आरोपींची ओळख पटलेली नाही.ट्रेलर चालक राजू रामकरण गुजर (३२) आणि त्यांचे मित्र भागचंद हे दोघे पनवेल येथील न्हावाशेवा येथून लोखंडी सळईने भरलेला ट्रेलर जयपुर येथे घेऊन जात होते. त्यांचा ट्रेलर रांजनोली नाका येथे आला असता, संजय आणि हरेंद्र या दोघांनी त्यांचा ट्रेलर अडवला. त्यानंतर बाबु शेख, प्रवीण जाधव आणि इतर दोन जण रिक्षामधून तिथे आले.

हेही वाचा >>>डोंबिवलीत मुलाकडूनच आई-वडिलांच्या घरातील तिजोरीतील रोख रकमेची चोरी

प्रवीण जाधव यांनी वाहतूक पोलीस असल्याचे सांगून ट्रेलरमध्ये असलेल्या लोखंडी सळईबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. राजू यांनी सळईचा माल जयपुर येथे घेऊन जात असल्याचे सांगत त्या मालाचे देयक दाखवले. यानंतरही, प्रवीण यांनी दमदाटी करत १५ लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर कारवाई करण्याची धमकी दिली.त्यानंतर, प्रविण जाधव यांनी संजय तिवारी आणि हरेंद्र गौतम यांना याठिकाणी थांबण्यास सांगून ते बाबू शेख तसेच इतर दोघांसोबत निघून गेले. त्यानंतर, त्या ठिकाणी कोनगाव पोलीस ठाण्यातून दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी टेलर चालकाकडे चौकशी केली असता, ट्रेलर चालकाने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against six persons including a traffic police officer in extortion case thane amy
Show comments