भिवंडी येथील अजमेर नगर परिसरात राहणारा प्रथमेश यादव या १८ महिन्याच्या बालकाचा खेळताना घरासमोरील उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. गटार बांधणाऱ्या ठेकेदाराने त्यावर सिमेंटचे झाकण अथवा लादी बसविली नसल्याने हा मृत्यू झाल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दोन बांधकाम ठेकेदार आणि भिवंडी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंत्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- वाहन खरेदीच्या बहाण्याने डोंबिवलीतील व्यावसायिकाची फसवणूक

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

भिवंडी येथील नारपोली भागात असणाऱ्या अजमेरनगर येथील एका चाळीत कमलेश यादव त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. एक आठवड्यापूर्वी कमलेश यांच्या घरी एक कौटुंबिक कार्यक्रम होता. यावेळी अनेक लोक आले होते. यावेळी त्यांचा १८ महिन्याच्या मुलगा प्रथमेश यादव हा खेळताना घरासमोरील उघड्या गटारात पडला. गर्दीमुळे प्रथमेश गटारात पडल्याचे कोणाच्या लागलीच निदर्शनास आले नाही. मात्र काही वेळानंतर शोधाशोध सुरु झाल्याने प्रथमेश घरासमोरील गटारात पडल्याचे दिसून आले. भिवंडी महापालिकेतर्फे कमलेश यांच्या चाळीत गटारांची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील इंजिनीअर विद्यार्थ्याची कोल्हापूर येथे ३० लाखाची फसवणूक

बुबेरे ऍण्ड असोसिएट्सचे मुक्तदिर बुबेरे यांच्या समवेत प्रवीण सूर्यराव या ठेकेदारांनी हे काम केले होते. मात्र रहिवासी वस्तीतून जाणाऱ्या या गटारींवर अनेक ठिकाणी झाकण अथवा लादी बसविली नव्हती. स्थानिक रहिवाश्यांकडून याबाबत वारंवार तक्रार देखील करण्यात येत होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे प्रथमेश यादव या बालकाचा गटारातील पाण्यात पडून मृत्यू झाला. अशी तक्रार त्याचे वडील कमलेश यादव यांनी नारपोली पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलिसांनी संबंधित दोन ठेकेदार आणि भिवंडी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबात अधिक तपास सुरु असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader