ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात मोटारमनच्या डब्यात शिरून लोकल थांबविल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडून महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे कलम कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. दिवा रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी ३० वर्षीय महिलेने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडीत प्रवेश करून रेल्वेगाडी अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गोंधळ उडाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे १५ मिनीटे रेल्वेगाडी एकाच ठिकाणी उभी होती. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात रेल्वे कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती दिवा भागात राहणारी असून दररोज प्रवास करणारी आहे. दरम्यान, जलद रेल्वेगाडी फलाट क्रमांक चार ऐवजी दोनवर आली होती. त्यामुळे महिलेने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against the woman who entered the motorman compartment ysh
Show comments