ठाणे : डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. २९ वर्षीय तरुणीने दिलेला तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ठाण्यात राहत असून तिची ओळख पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पृथ्वीराज पाटील याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिने या प्रकरणात कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader