ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी महायुतीकडून जाहीर होताच, महायुतीमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहे. तर, महाविकास आघाडी आणि मनसेत मात्र तूर्तास तरी बंडखोरी होताना दिसून आलेली नाही. ठाणे शहर, कोपरी-पाचपखाडी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड आणि ऐरोली मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवारी मिळू शकली नसल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान महायुतीपुढे असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यात ऐरोली, बेलापूर, कोपरी-पाचपखाडी,ओवळा- माजीवडा, ठाणे शहर, मीरा-भाईंदर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर असे १८ विधानसभा मतदारसंघ येतात. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे चित्र असून काही ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केल्याने तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. तीन दिवसांपूर्वी भाजपने पहिली यादी जाहीर करत ठाणे शहरमधून संजय केळकर, डोंबिवलिमधून रविंद्र चव्हाण, एरोलीमधून गणेश नाईक, भिवंडी पश्चिमेतून महेश चौगुले, मुरबाडमधून किसन कथोरे या विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. तर, कल्याण पूर्वेमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. उल्हासनगरमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, ही यादी जाहीर होताच या मतदार संघामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या शिंदे सेनेच्या काही पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी आता उमेदवारी अर्ज घेत अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

Nashik Central constituency remains contentious between BJP and Shiv Sena
नाशिक मध्य जागेवरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
ncp ajit pawar loksatta
विश्वासात घेत नसल्याने जळगावमध्ये महायुतीत राष्ट्रवादी भाजप, शिवसेनेवर नाराज
transposition of leaders frome one party to another party in Palghar
पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर
maha vikas aghadi accuses bjp of altering voter lists ahead of maharashtra assembly polls
मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार
Rahul Aher, Rahul Aher, BJP MLA Rahul Aher,
कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार
Congress Latur, constituencies in Latur, Latur latest news,
लातूरमधील सर्व मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
MIM has decided to contest four seats in Solapur district in the upcoming assembly elections 2024
सोलापुरात ‘एमआयएम’च्या पवित्र्याने  महाविकास आघाडीची डोकेदुखी; शहर, जिल्ह्यात चार जागा लढणार

हेही वाचा – विधानसभा आचारसंहितेच्या निर्बंधांमुळे शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनांवर बंधने

ठाणे शहरांमध्ये भाजप उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याण पूर्वमध्ये सुलभा गायकवाड यांच्याविरोधात शिंदेंच्या सेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी शिंदेच्या सेनेतील सुभाष पवार यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी (शरद पवार गटात) प्रवेश करून उमेदवारी घेतली आहे. याच मतदारसंघात शिंदेच्या सेनेचे वामन म्हात्रे हेसुद्धा अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. एरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक यांच्याविरोधात शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी विजय चौगुले हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील ४५ उमेदवारांमध्ये ठाणे जिल्ह्यातही कोपरी- पाचपखाडी, ओवळा- माजीवडा वगळता एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. कोपरी- पाचपखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर, ओवळा- माजीवडामधून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे शहरात शिंदेच्या सेनेतील इच्छुकांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरू केल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. या बंडखोरांमुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असून या बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान महायुतीपुढे आहे.

हेही वाचा – पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !

कल्याण पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेच्या सेनेला मिळणार असून या मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे शहरप्रमुख रवी पाटील हे इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली नाहीतर ते बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हेसुद्धा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इथे उमेदवारी जाहीर होताच, बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.