डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील गणेशघाट भागातील खाडीत एका ५० वर्षाच्या नागरिकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. या व्यक्तिची ओळख पटली नाही. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> ठाणे : मीनाताई उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील खाडी भागात एक व्यक्ति बुडाल्याची माहिती मिळाल्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलालाला पाचारण करण्यात आले. मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला. मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आला आहे.