कल्याण – निर्माणाधिन इमारतीच्या बाजूला असलेल्या विकास आराखड्यातील रस्त्याचे काम करणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराला बुधवारी चारजणांनी कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय परिसरात बेदम मारहाण केली. या ठेकेदाराला हातामधील लोखंडी धारदार फाईटरने मारहाण करून, रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आली आहे.

या घटनेचा इतर बांधकाम ठेकेदारांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रफुल्ल हरीभाई सेंजालिया (५३) असे बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहतात. सुनील भानुशाली आणि त्याचे तीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.

Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?

हेही वाचा – डोंबिवली पूर्व फ प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांचा विळखा कायम, वरिष्ठांना दाखविण्यासाठी कारवाईचा देखावा

हेही वाचा – ठाणे : वाहनांना टोलमुक्ती द्या, लघु उद्योजकांची मागणी

पोलिसांनी सांगितले, बांधकाम ठेकेदार प्रफुल्ल सेंजालिया यांचे संदीप हाॅटेलच्या पाठीमागील भागात रस्ते काम सुरू आहे. या भागात ते विकास आराखड्यातील रस्त्याचे काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांच्या कामगारांच्या हातून सुनील भानुशाली यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले पत्रे तोडले. यामुळे आपले नुकसान झाले, असा आरोप करत सुनील भानुशाली आणि त्याच्या तीन साथीदारांनी बुधवारी दुपारी प्रफुल्ल यांना गाठले. त्यांना पत्रे तोडल्याचा जाब विचारून चारजणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हातामधील लोखंडी फाईटरने झालेल्या मारहाणीत प्रफुल्ल यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय सुनील यांनी रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी प्रफुल्ल यांना दिली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एन. के. यशवंतराव तपास करत आहेत.

Story img Loader