कळवा येथील खारेगाव भागात रविवारी नाल्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सांयकाळी उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
खारेगाव येथील टोलनाका भागात रविवारी दुपारी एका नाल्यामध्ये अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. या घटनेची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, ठाणे महापालिकेचा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह नाल्याच्या बाहेर काढला. हा मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.