कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाशी छेडछाड करणाऱ्या एका दारुड्याला महिलेसह इतर प्रवाशांनी बेदम चोप दिला आणि त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिेले. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्र नामदेव जाधव (२५, रा. कोळसेवाडी, कल्याण) असे आरोपीचे नाव आहे. महिला प्रवाशाची छेड काढल्यानंतर महेंद्रविरुद्ध तक्रार दाखल करण्यास महिलेसह इतर कोणीही प्रवासी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी स्वत:हून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालून महिलेची छेड काढल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस कायद्याने महेंद्रविरुद्ध कारवाई केली.

हेही वाचा – कळवा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय टळणार; प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता पदांची भरती प्रकिया सुरू

पोलिसांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वी एक महिला कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून लोकल पकडण्यासाठी जात होती. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या महेंद्रने प्रवाशी महिलेची छेड काढली. सुरुवातीला महिलेने दुर्लक्ष केले. महेंद्र त्या महिलेकडे पाहून अश्लिल चाळे करू लागला. महिलेने याविषयी ओरडा करताच इतर प्रवासी या महिलेच्या सहकार्यासाठी पुढे आले. महेंद्रने दारूच्या नशेत प्रवाशांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी महेंद्रला बेदम चोप देत त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे तपास करत आहेत.