लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: घोडबंदर येथील कासारवडवली भागातील महापालिकेच्या रोझा गार्डेनिया रुग्णालयातील विद्युत मीटर खोलीला बुधवारी रात्री आग लागली. बाळ‌कुम अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.

rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
Ramtekadi dumper and JCB burnt
पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार

घोडबंदर येथील कासारवडवली भागात महापालिकेचे रोझा गार्डेनिया रुग्णालय आहे. तळ अधिक तीन मजली इमारतीत हे रुग्णालय आहे. तळ मजल्यावर बाह्य रुग्ण कक्ष, पहिला मजल्यावर प्रसुतीगृह, दुसऱ्या मजला रिकामा आहे तर, तिसऱ्या मजल्यावर डायलेसिस विभाग आहे.

हेही वाचा… कल्याण ग्रामीण भागाला पुराचा फटका, रायते पुलावर पाणी आल्याने कल्याण-नगर रस्ता बंद

बुधवारी रात्री १.५० वाजता रुग्णालयातील मीटर खोलीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. या घटनेनंतर विद्युत विभागाने रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत केला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर बाळकुम अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. रुग्णालयातील प्रसुतीगृहामध्ये तीन महिला आणि तीन बालके होती. आगीच्या घटनेमुळे आणि वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्यांच्यासह नातेवाईक भयभीत झाले होते. परंतु आग मोठी नसल्यामुळे आणि ती तात्काळ विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.