लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: घोडबंदर येथील कासारवडवली भागातील महापालिकेच्या रोझा गार्डेनिया रुग्णालयातील विद्युत मीटर खोलीला बुधवारी रात्री आग लागली. बाळकुम अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.
घोडबंदर येथील कासारवडवली भागात महापालिकेचे रोझा गार्डेनिया रुग्णालय आहे. तळ अधिक तीन मजली इमारतीत हे रुग्णालय आहे. तळ मजल्यावर बाह्य रुग्ण कक्ष, पहिला मजल्यावर प्रसुतीगृह, दुसऱ्या मजला रिकामा आहे तर, तिसऱ्या मजल्यावर डायलेसिस विभाग आहे.
हेही वाचा… कल्याण ग्रामीण भागाला पुराचा फटका, रायते पुलावर पाणी आल्याने कल्याण-नगर रस्ता बंद
बुधवारी रात्री १.५० वाजता रुग्णालयातील मीटर खोलीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. या घटनेनंतर विद्युत विभागाने रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत केला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर बाळकुम अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. रुग्णालयातील प्रसुतीगृहामध्ये तीन महिला आणि तीन बालके होती. आगीच्या घटनेमुळे आणि वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्यांच्यासह नातेवाईक भयभीत झाले होते. परंतु आग मोठी नसल्यामुळे आणि ती तात्काळ विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.