ठाणे : कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या प्रसुती गृहातील एका कक्षामध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रसुती गृहात आठ रुग्ण होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग विजविणे शक्य झाल्याने दुर्घटना टळली. कोपरी येथील धोबीघाट परिसरात ठाणे महापालिकेच्या प्रसुती गृहाची इमारत आहे. गुरूवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास येथील पहिल्या मजल्यावरील कक्षातील पंख्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊन अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक, विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रसुती गृहात एकूण आठ रूग्ण होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील विद्युत पुरवठा तात्पुरता खंडीत गेला. त्यानंतर अग्निरोधक यंत्राच्या मदतीने सुमारे अर्ध्यातासात आग विजविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire room in the maternity home of thane municipal corporation in kopari ysh
Show comments