भिवंडी येथील आझमी नगर भागात शुक्रवारी एक पाच वर्षांची मुलगी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेली. याप्रकरणाची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रशासनाकडून तिचा शोध सुरू आहे. परंतु रात्री उशीरापर्यंत तिचा शोध लागू शकला नाही.
आझमी नगर येथे गुलखान खातून अन्सारी ही पाच वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी नाल्याचे या परिसरात शिरले होते. या नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात मुलगी वाहून गेली. भिवंडी अग्निशमन दलाकडून तिचा शोध सुरू होता. परंतु शोध लागू शकला नाही. तिचा शोध सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली