कल्याण : कल्याण पूर्वेतील मेट्रो व्यापारी संकुला जवळील उर्दू शाळेच्या परिसरात शुक्रवारी सकाळी घरगुती सिलिंडर वाहून नेणारा ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटला. वाहन चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अवजड ट्रक रस्त्यावर कोसळल्याने मोठा आवाज झाला. ट्रकमधील सिलिंडर रस्त्यावर पसरले. यामुळे काही वेळ या रस्त्यावर कोंडी झाली. सिलिंडरचा ट्रक पलटी झाल्यामुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली. सिलिंडर जोराने रस्त्यावर आपटल्याने टाकी फुटून त्यामधून गॅस बाहेर येतो की काय अशी भीती रहिवाशांमध्ये पसरली. त्यामुळे कोणीही रहिवासी, वाहन चालक सुरुवातीला या ट्रकच्या परिसरात बचाव कार्यासाठी आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूचक नाक्याकडून ट्रक कल्याण पश्चिमेत सिलिंडर घेऊन जात होता. मेट्रो व्यापारी संकुला समोरील रस्त्यावरुन जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्ता दुभाजकाला जोराने धडकून रस्त्यावर उलटला. सिलिंडर मधून गॅस बाहेर येत असेल या भीतीने कोणीही वाहन चालकाने वाहन पुढे नेण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा काही वेळ कोंडी झाली. हा प्रकार कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी सर्व वाहतूक पोलीस, सेवक आणि बचाव पथकाला बोलावून घेतले. रस्त्यावरील सिलिंडर धोकादायक नाहीत याची खात्री करुन ते रस्त्याच्या एका बाजुला ढीग लावून ठेवण्यास सुरुवात केली. उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजुला करुन तात्काळ वाहतूक सुरळीत केली.