डोंबिवलीतील एका १७ वर्षाच्या तरूणीला ‘तुझा मोबाईल मी ओएलएक्सवरून खरेदी करणार आहे. तू कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ये’ असे सांगितले. तरुणी आल्यानंतर तिच्या जवळील मोबाईल काढून अनोळखी तरूण पसार झाला आहे. मोबाईल विक्रीतून आपली फसवणूक झाल्याने तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अज्ञात इसमाचा शोध सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी इसमाने तरुणीच्या मोबाईलवर संपर्क केला. ‘तुझा ओएलएक्स उपयोजनवरील मोबाईल वन प्लस नॉड मी खरेदी करणार आहे. तो मोबाईल मला प्रत्यक्ष पाहावा लागेल. यासाठी तू कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ये,’ असे सांगितले. अज्ञात इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तरुणी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील बालाजी हॉटेल समोर जाऊन ठरल्या ठिकाणी उभी राहिली. अज्ञात इसमाने तिला तेथे स्वताची ओळख दिली. तरुणीकडून मोबाईल बघण्यासाठी घेतला. हा मोबाईल मी मोबाईल विक्रेत्याला दुकानात जाऊन दाखवितो. तू येथे थांब असे सांगून इसम तेथून निघून गेला. बराच उशीर झाला तरी इसम परत आला नाही. त्याला संपर्क करण्यासाठी तरुणीजवळ मोबाईल नव्हता.

आपणास मोबाईलचे पैसे न देता आपली फसवणूक करून अज्ञात इसमाने आपला मोबाईल लबाडीने चोरून नेला हे लक्षात आल्यावर तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रहिवासी, पादचारी हैराण

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील रहिवासी जगदीश म्हात्रे यांच्या घरातून चोरट्याने त्यांच्या दोन्ही मुलांचे एकूण ३० हजार रूपये किमतीचे मोबाईल चोरून नेले आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी जगदीश यांची मुलगी अलिशा म्हात्रे यांनी तक्रार केली आहे. मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रहिवासी, पादचारी हैराण आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl cheated on the pretest of buying mobile in kalyan sgy
Show comments