कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगात सोमवारी संध्याकाळी एका न्यायबंदीने एका गृहरक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या गृहरक्षकाच्या गणवेशावरील शासकीय खुणा तोडून नुकसान केले. कर्तव्य करत असताना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गृहरक्षकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी न्यायबंदी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंकज संतलाल यादव असे मारहाण करणाऱ्या न्यायबंदीचे नाव आहे. विनायक धर्मदास भालेराव असे आधारवाडी कारागृहातील गृहरक्षकाचे नाव आहे. आधारवाडी तुरुंगातील रुग्णालय कक्षात हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला.

हेही वाचा – कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करणारे दोन जण अटकेत

गृहरक्षक भालेराव यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की न्याय बंदी पंकज यादव यांना आपण तुरुंगातील मुलाखत कक्षातून घेऊन रुग्णालय कक्षात परत येत होतो. मुलाखत कक्ष ते रुग्णालय कक्षादरम्यान न्यायबंदी पंंकज यांनी गृहरक्षक भालेराव यांना, तू माझी मुलाखत पूर्ण होऊ दिली नाही. माझी मुलाखत अर्धवट राहिली, असे बोलून पंकज यांनी भालेराव यांना हातवारे करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी गृहरक्षक भालेराव यांनी तुमची मुलाखत अर्धवट राहिलेली नाही. तुम्ही माझ्याशी नीट बोला. हे वाक्य पूर्ण होताच न्यायबंदी पंकज यादव यांनी रागाच्या भरात गृहरक्षक भालेराव यांच्या अंगावर धाऊन जाऊन त्यांंच्या सदऱ्याची गळपट्टी पकडली. अचानक न्याय बंदीने हल्ला केल्याने भालेराव यांंनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या पंकज यांनी भालेराव यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. त्यांचा सदरा आणि गळपट्टी पकडली. या झटापटीत भालेराव यांच्या गणवेशावरील शासकीय खुणांची पट्टी तुटली. इतर कर्मचारी धाऊन आल्यानंतर भालेराव यांची सुटका झाली.

हेही वाचा – ठाणे : स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी युवा दौड

सरकारी कामात पंकज यांनी अडथळा आणला म्हणून भालेराव यांनी त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमाने गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जी. जोशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.