ठाणे : घोडबंदर येथील नागलाबंदर भागात खडी यंत्रामध्ये पडून भलबद्र यादव (४०) या मजुराचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा साधने पुरविली नसल्याप्रकरणी खडी यंत्र मालकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागलाबंदर भागात भलबद्र हे त्यांची पत्नी, तीन मुली आणि एका मुलासोबत राहत होते. ते परिसरात खडी यंत्र चालविण्याचे काम करतात. गुरुवारी सांयकाळी ते खडी यंत्रामध्ये खडीची पावडर करण्याचे काम करत होते. त्यावेळी तोल जावून ते या यंत्रात पडले. यंत्र सुरू असल्याने ते त्यात अडकले. घटनेची माहिती परिसरातील इतर मजुरांना मिळाली. त्यानंतर यंत्र बंद करण्यात आले. मजुरांनी त्यांना खडी यंत्रामधून बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना तपासले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

हेही वाचा – ठाणे : अटल सेतू, दिघा स्थानकाच्या कार्यक्रम पत्रिकेतून खासदार राजन विचारे यांचे नाव वगळले

हेही वाचा – ठाण्यातही अनधिकृत बांधकाम आणि कारवाईचा उल्हासनगर पॅटर्न, कारवाईत अडचणींचा डोंगर, तोडलेले स्लॅब जोडून पुन्हा वापरात

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी भलबद्र यांची पत्नी संजू हिने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खडी यंत्र मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader