पालघर तालुक्यातील दांडी या गावातील एका घरात बिबट्या शिरला आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या या गावातील हे घर विजय विठोबा तामोरे यांच्या मालकीचं आहे. घरामधील बाथरुममध्ये बिबट्याला बंदिस्त करण्यात आलं आहे. वनविभागाला कळवण्यात आलं असून बिबट्याला बंदिस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दांडी गावाच्या आजूबाजूला कोणतंही जंगल नसून तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या लगत असलेल्या जुन्या अकरपट्टी व पोफरण गावाच्या मध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसण्यात आले होते. हा तीन चार महिन्याचा बछडा असल्याची शक्यता असून त्याला बंदिस्त करण्याचे सर्वोपतरी प्रयत्न सुरु आहेत.