मुलाच्या शाळेत डान्स केला म्हणून पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने मुलाच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी डान्स केला होता. यामुळे चिडलेल्या पतीने बॅटने मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

19 जानेवारीला जेव्हा पीडित महिला कार्यक्रमानंतर घरी पोहोचली तेव्हा पतीने शाळेतील कार्यक्रमात डान्स करण्यावरुन तिच्याशी भांडण सुरु केलं आणि मारहाण केली. काही दिवसांपूर्वी महिलेने कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्यात भांडण झालं होतं. नंतर हे प्रकरण शांत झालं होतं.

यावेळी जेव्हा पतीने डान्स करण्यावर नाराजी व्यक्त केली तेव्हा पीडित महिलेनेही त्याचा विरोध केला. यामुळे पतीचा संताप झाला आणि त्याने बॅटने पत्नीला मारहाण केली. महिलेच्या हात, पाय आणि डोक्याला जखम झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.