भिवंडी येथील न्यू आझादनगर भागात मंगळवारी एका १३ वर्षीय मुलाला नशेबाजाने मारहाण करून त्याचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नहीम अन्सारी (३४) याला अटक केली आहे.
हेही वाचा- ठाणे : टिटवाळ्यात ५० हून चाळी, गाळे जमीनदोस्त; सरकारी, वन जमीनी हडप करण्याचा भूमाफियांचा डाव
न्यू आझादनगर भागात १३ वर्षीय मुलगा हा त्याच्या मित्रांसोबत उभा होता. त्याचवेळी नहीम हा नशेबाज त्याठिकाणी आला. तो मुलाकडे बघू लागल्याने मुलाने त्यास निघून जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने नहीमने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने त्यांचा गळा दाबून जीवे मारहण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नहीमला अटक केली आहे.