लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ: संस्थेला देण्यासाठी ४० डझन आंबे हवे आहेत असे सांगून अंबरनाथमध्ये एका भामट्याने आंबे विक्रेत्याला तब्बल ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने आंबे विक्रेत्याकडून ४० डझन आंबे खरेदी करत ३० हजारांचा धनादेश दिला. मात्र दिलेला धनादेश वटलाच नाही. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आंबे विक्रेत्यांचे ऐन हंगामात आर्थिक नुकसान झाले आहे.

fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Torres Scam Case, Assets seized, Torres ,
टोरेस घोटाळा प्रकरण : नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
mumbai torres jewellers loksatta news
टोरेस फसवणूकप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर गर्दी, ठेवीच्या परतफेडीसंदर्भात हजारो गुंतवणूकदारांचे अर्ज

अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक आंबे विक्रेते बसतात. येथेच शेजारी शिवसेना शहर शाखा आहे. शाखेच्या बाजूला गंगाराम बोऱ्हाडे अनेक वर्षांपासून आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ मे रोजी बोऱ्हाडे यांच्याकडे एक ग्राहक आला. सामाजिक संस्थेला दान करण्यासाठी ४० डझन आंबे हवे असल्याचे या ग्राहकाने सांगितले. एकाच वेळी एवढी मोठी खरेदी होणार असल्याने बोऱ्हाडे यांनीही त्याला ४० डझन आंबे देऊ केले. त्याबदल्यात या ग्राहकाने बोऱ्हाडे यांना ३० हजार रुपयांचा धनादेश देऊ केला.

हेही वाचा… रेती उत्खननामुळे भविष्यात रेल्वे मार्गाला धोका? ठाणे महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली भिती

सामाजिक संस्थेला आंबे जाणार असल्याने बोऱ्हाडे यांनीही धनादेश स्वीकारला. बँक ऑफ बडोदा बँकेच्या ठाणे पश्चिम शाखेच्या या धनादेशावर गोकुळदास क्रिशनदास आढिया असे नाव होते. हा धनादेश बोऱ्हाडे यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात टाकला. मात्र आठवडाभराने हा धनादेश वटणार नसल्याचे त्यांना त्यांच्या बँकेतून सांगण्यात आले. धनादेश देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात एवढी रक्कमच नसल्याचे सांगण्यात आले. बोऱ्हाडे यांनी या गिऱ्हाईकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ग्राहकाचा फोन बंद आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोऱ्हाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली. या प्रकरणी आता पोलिसांकडून या भामट्या गिऱ्हाईकाचा शोध घेतला जातो आहे. मात्र ऐन हंगामात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आंबे विक्रेते बोऱ्हाडे हवालदिल झाले आहेत.

Story img Loader