उत्तन येथील पालिकेच्या घनकचरा भुमीत साचलेल्या कचऱ्याला शनिवारी रात्री आठच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे लोट उडू लागले आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन

Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले
Gun fire near Sanpada station , Sanpada station,
नवी मुंबईतील थरारक घटना, वर्दळीच्या ठिकाणी ५ राऊंड फायर करून दुक्कल फरार

भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पात कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली असल्यामुळे सुमारे साडे आठ लाख टन कचऱ्याचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिला आहे.अश्या परिस्थितीत शनिवारी रात्री आठच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.आगीची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या उपस्थितीत राहिल्या असून आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर मागवले जात आहेत.

हेही वाचा- VIDEO : शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय होताच कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष

ही आग कचऱ्यामध्ये निर्माण होणाऱ्या मिथेन गॅसमुळे लागली असून ती वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाढत जात आहे. त्यामुळे येत्या दोन तासातच आगीवर नियंत्रण मिळण्याची मोहीम आखण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

Story img Loader