डोंबिवली – येथील ठाकुरवाडी भागात राहत असलेला एक १७ वर्षांचा अल्पवयीन तरुण दुचाकी घेऊन ठाकुर्लीमधून जात होता. या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका पादचाऱ्याला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले.

डोंबिवलीतील सतीश शिंदे आणि अविनाश कदम हे मंगळवारी दुपारी ठाकुर्ली येथे पायी जात होते. रस्ता ओलांडत असताना त्यांच्यासमोर आरोपी अल्पवयीन दुचाकी घेऊन आला. त्याला दुचाकी नियंत्रित झाली नाही. त्याने अविनाश कदम यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या हात, पायाला गंभीर दुखापत झाली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pedestrian day Pedestrian Policy Pune Municipal Corporation pune news
पदपथांंअभावी पादचारी ‘दीन’
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली

हेही वाचा – आता मुरबाडपर्यंत गोदामांच्या रांग; भिवंडीचे व्यापार केंद्र विस्तारण्याच्या हालचाली

हेही वाचा – उल्हास नदीत वाहनांची यथेच्छ धुलाई, रिक्षा, दुचाकी थेट नदी पात्रात, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याने तक्रारदार सतीश शिंदे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १८ वर्षांखाली तरुणाने वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असूनही या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणाने दुचाकी चालविल्याने त्याच्या पालकांवर वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader