कल्याण – देवतेविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप करत कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका अल्पवयीन मुलाला अटाळी, वडवली, वाडेघर भागातील तरुण-तरुणींच्या जमावाने दोन दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. या मुलाची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १६ आरोपींपैकी १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये चार अल्पवयीन मुले आहेत. त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अटक आरोपी युवा वर्गातील आहेत, असे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवतेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे वक्तव्य समाज माध्यमावरून हटवून टाक, अशी मागणी वडवली, अटाळी, वाडेघर भागातील तरुणांनी अल्पवयीन मुलाकडे केली. या मुलाने ही वक्तव्य करणाऱ्या चारजणांना यासंदर्भात सूचना केली. त्यांनी ती ऐकली नाही. आपले श्रद्धास्थान असणाऱ्या देवतेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राग तरुणांना आला. त्यांनी अल्पवयीन मुलगा काम करत असलेल्या खडकपाडा भागातील केकच्या दुकानात येऊन त्याला माफी मागावयास लावली. हे प्रकरण संपले म्हणून मुलगा निश्चिंत झाला.

हेही वाचा – कल्याण : शिळफाटा रस्त्यावरून दिवसा अवजड वाहनांची चोरटी वाहतूक

अटाळी, वडवली, वाडेघर भागातील तरुण मुले संघटित होऊन त्यांनी अल्पवयीन मुलाला अटाळी वडवली भागात निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. या मुलाच्या अंगावरील कपडे फाडून त्याची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. कायदा हातात घेतल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी समाजमाध्यमात प्रसारित छायाचित्रांच्या आधारे आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

हेही वाचा – ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

दर्शना पाटील, शर्मिला लिंबरे, डी. जी. जाॅन, डोंगरे, निकिता कोळी, समर्थक चेंडके, अभिजित काळे, प्रथमेश डायरे, साहिल नाचणकर, कुणाल भोईर, नितीन माने, दीपक शिंदे, विजय कदम, सागर निळजेकर, विनय सुतार, जय भोईर, नीतेश ढोणे अशी आरोपींची नावे आहेत. समाजमाध्यमावर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या चारजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor boy beaten up in attali wadavali area in kalyan ssb