कल्याण- कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी संध्याकाळी एका २० वर्षाच्या तरुणाने एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चाकुने सात ते आठ वार करुन तिला ठार मारले. हल्लेखोर तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आदित्य कांबळे (२०) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. तो तिसगाव भागातील रहिवासी आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. तिसगाव मधील दुर्गा देवी सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सुत्रांनी सांगितले, संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य हा दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांकडून संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. आदित्य हा मयत मुलगी राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या

हेही वाचा >>>कल्याणमधील महिला पोलीस बेपत्ता; बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार

मयत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आई सोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकुने आठ वार केले. तिच्या आईने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बेभान झालेल्या आदित्यने तिच्या आईला दाद दिली नाही. छातीवर जिव्हारी घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली. आईने ओरडा करताच सोसायटीतील रहिवासी, पादचारी घटनास्थळी धावून आले. आदित्य तेथून पळून जात होता. रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गंभीर जखमी मुलीला तात्काळ लगतच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.