डोंबिवली – डोंबिवली जवळील पलावा-खोणी गृहसंकुलातील जॅस्मिन सोसायटीत दोन भावांनी बांगलादेशमधून घर सांभाळण्यासाठी ठेवलेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने राहत्या घरात अत्याचार केले. या मुलीला बाहेरील हाॅटेलमध्ये नेऊन तिला जबरदस्तीने देहविक्रय करण्यासाठी भाग पाडल्याचा प्रकार या अल्पवयीन मुलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीवरून उघडकीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज उर्फ सतीश राजेश रजत, सचीनकुमार विजय रजत अशी दोन्ही भावांची नावे आहेत. याशिवाय इतर तीन जणांंनी पीडितेवर विविध हाॅटेलमध्ये सतीशच्या पुढाकाराने लैंगिक अत्याचार केला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा – विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?

पोलिसांनी सांंगितले, पीडित मुलगी ही बांंगलादेशमधील बागेरहाट जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती या जिल्ह्यातील एका गावात आपल्या मजुरी करणाऱ्या आईसह राहत आहे. मुलीचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. तिला फक्त बंगाली भाषा येते. दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये पीडितेची मावशी मुंबईतून पश्चिम बंगालमध्ये आली. ती पीडितेच्या घरा शेजारी राहते. तिने पीडितेच्या आई, मुलीला सांंगितले मी मुंंबईजवळील एका शहरात राहते. तेथे दागिन्यांंना कलाकुसर करण्याची कंपनी आहे. त्या कंंपनीत ३० हजार रुपये पगार मला मिळतो. तुम्ही तेथे आलात तर तुम्हालाही रोजगार मिळेल. पीडिता आणि तिच्या आईने मावशीसोबत मुंबईत येण्याची तयारी केली. जवळ पारपत्र नसल्याचे पीडितेने सांगितले. त्यावेळी मावशीने सांगितले, तुम्ही काळजी करू नका तुम्हाला बांगलादेश कलिगंज येथे एक इसम भारतीय हद्दीत घुसविण्याचे काम करील. तीन इसमांनी आम्हाला बांंगलादेश-भारतीय हद्दीमधील गुप्तरित्या असलेल्या मलनिस्सारणच्या एका मोठ्या वाहिनीमधून भारतीय हद्दीत सोडले. तेथे बिश्टी इसमाने पीडितेला तिच्या आई, मावशीला हावडा मुंबई एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात उतरण्याची सोय केली.

कल्याण रेल्वे स्थानकात आरोपी सतीश रजत पीडिता आणि तिच्या आईला पलावा येथील जस्मिन इमारतीत राहण्यासाठी घेऊन गेला. सतीश याने तिन्ही महिलांचे विविध पेहरातील प्रतीमा काढण्यासाठी त्यांना सज्ज राहण्यास सांगितले. त्यास महिलांनी नकार दिला. सतीशने तुम्हाला नोकरीसाठी बांगलादेशमधून भारतात आणताना आमचा अधिक प्रमाणात खर्च झाला आहे. ते पैसे वसुल करण्यासाठी तुम्हाला काही दिवस देहविक्री करावी लागेल. या महिलांनी त्यास नकार देताच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी सतीशने दिली.

हेही वाचा – भिवंडीतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारादरम्यान पिस्तुल, परंतु खेळण्यातील….

पीडितेची अर्धनग्न अवस्थेतील प्रतिमा काढून त्या समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी सतीशने दिली. दरम्यान सतीश, त्याचा चुलत भाऊ राज यांनी पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. अन्य तीन जणांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आपली देहविक्री करण्याची तयारी सतीशने सुरू केली होती. त्यामुळे आपण सतीशचा आपणास सांभाळण्यास दिलेला चार वर्षाचा मुलगा, काळजीवाहक तासीन शेख याच्यासह गेल्या शुक्रवारी पहाटे चार वाजता भिवंडी येथे पळून आलो. जेणेकरून आपल्या आई, मावशीला सतीश सोडून देईल आणि आम्ही बांगलादेशला जाऊ हा उद्देश होता, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl from bangladesh was sexually assaulted by two brothers at the palava home complex in dombivli ssb