कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या ड प्रभाग कार्यालया समोर सोमवारी रात्री एका १७ वर्षाच्या तरुणाला त्याच्या मैत्रिणीच्या वादातून चार तरुणांनी बेदम मारहाण केली. या अल्पवयीन तरुणाच्या हात, दंड आणि डोक्याला मारहाणीत गंभीर दुखापती झाल्या आहेत.कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अल्पवयीन तरुणाने तक्रार केल्यानंतर चार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पांडे, आदित्य मिश्रा, अरबाज आणि अनोळखी तरुण अशी आरोपींची नावे आहेत. ते फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे : मोबाईल चोरला पण आरोपी दुचाकीवरून पडला, पोलिसांच्या ताब्यात येताच मोठी टोळी गजाआड, २० महागडे मोबाईल जप्त

पोलिसांनी सांगितले, सतरा वर्षाचा अल्पवयीन तरुण कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी भागातील माॅडेल शाळेच्या पाठीमागील एका चाळीत राहतो. तो एका शाळेत शिक्षण घेतो. सोमवारी रात्री पीडित तरुण खासगी शिकवणी वर्ग सुटल्यानंतर मित्राच्या दुचाकीवरुन घरी जात होता. पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या समोर पीडित तरुण बसलेली दुचाकी येताच आरोपी राहुन पांडे याने पीडित तरुण बसलेली दुचाकी थांबवली. या दुचाकीवरील अल्पवयीन तरुणाला ‘तु माझ्या मैत्रिणी बरोबर का फिरतोस. तु तिच्या बरोबर फिरणे बंद कर’ असे बोलून अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तात्काळ आपल्या आदित्य, अरबाज आणि अन्य एक मित्राला घटनास्थळी बोलविले. या चार जणांनी मिळून अल्पवयीन तरुणाला आणि त्याच्या मित्रांना मध्यस्थी का करता म्हणून ठोशाबुक्क्यांनी, दांडके,लोखंडी गजाने मारहाण केली. पीडित तरुण रक्तबंबाळ झाला. तात्काळ या तरुणांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते.कल्याण पूर्व भागात तरुणांची दांडगाई वाढत चालल्याने अनेक पालक नाराज आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor was brutally beaten due to a dispute with his girlfriend in kalyan amy