डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील ग प्रभाग हद्दीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या खेळाचे मैदान आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी मोबाईल मनोरा उभारणीस परवानगी देऊन त्याचे भाडे घेण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आयरे भागातील ग्रामस्थांनी केल्या आहेत.

आयरे ग प्रभागतील पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या बाजूला पालिकेचे खेळाचे आरक्षण असलेला भूखंड आहे. या भूखंडावर भूमाफियांनी पहिले बेकायदा चाळी बांधल्या. आता त्या जागेतील मोकळ्या भागात एका कंपनीला मोबाईल उभारण्यास परवानगी देऊन तेथील भाडे स्वत: घेण्यास सुरुवात केली आहे, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

हेही वाचा – कल्याणमधील खासगी रुग्णालयाला रुग्णाला १० लाख भरपाईचे ग्राहक मंचाचे आदेश

ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे बेकायदा इमारती आणि भूमाफियांच्या भेटीगाठीसाठी नियमित या भागात फिरतात. त्यांना पालिका आरक्षणाखाली हा बेकायदा मोबाईल मनोरा, तेथील बेकायदा चाळी दिसत नाहीत का, असे प्रश्न स्थानिक रहिवासी करत आहेत. याविषयी अनेक रहिवाशांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत.

आयरे गाव हद्दीत १४ बेकायदा इमारती गेल्या वर्षभरात उभ्या केल्या आहेत. या इमारतींवर, वळण रस्त्यांवरील बेकायदा चाळींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दोन महिन्यांपूर्वीच ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना दिले आहेत. पोलीस बंदोबस्ताची मागणी स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे, असे तकलादू कारण देऊन ते नव्याने उभ्या राहिलेल्या १४ बेकायदा इमारतींवर मागील दोन महिन्यांपासून कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी आहेत.

आयरे भागातील बहुतांशी बेकायदा इमारतींमध्ये पालिका अधिकारी आणि पोलीस यांचा पैसा आहे. या इमारतींवरील कारवाई टाळण्यासाठी एका पालिका कामगाराने साबळे यांना वरिष्ठांशी संधान साधून ग प्रभागात आणून ठेवल्याची चर्चा पालिकेत आहे. आयरे गाव हद्दीत नव्याने ३२ बेकायदा बांधकामांच्या उभारणीचे नियोजन माफियांनी करून ठेवले आहे, असे तानाजी केणे यांनी सांगितले. १४ बेकायदा इमारतींवर साहाय्यक आयुक्त साबळे कारवाई करत नसल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी स्थानिक रहिवासी अंकुश केणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. आयुक्त दांगडे यांनी साहाय्यक आयु्क्त म्हणून काम करताना साबळे यांनी किती बेकायदा इमारती पाडल्या याची माहिती मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणारा चोरटा अटक

पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये बेकायदा इमारती तोडण्याची कारवाई जोमाने सुरू असताना ग प्रभागात एकाही बेकायदा इमारतींवर साबळे यांच्याकडून कारवाई करण्यात येत नाही, असे रहिवाशांनी सांगितले. ज्या प्रभागांमध्ये साबळे यांनी साहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहे. तेथे ते कधीच बेकायदा इमारती तोडण्याचे धाडस करत नाहीत, असे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले. आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपण साबळे यांच्या कामचुकार पद्धतीची तक्रार करणार आहोत, असे पाटील म्हणाले.

पालिकेच्या मालमत्ता, नगररचना, वित्त विभागातील अधिकाऱ्यांना आयरे गावातील मोबाईल मनोऱ्याच्या परवानगी आणि भाड्याविषयी विचारणा केली असता, अशाप्रकारे कोणत्याही मोबाईल मनोऱ्याला आयरे गावात परवानगी दिलेली नाही. त्याचे भाडे आपण वसूल करत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.