कल्याण: एका खासगी मोटार चालकाने शुक्रवारी पहाटे एका २३ वर्षाच्या नोकरदार महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरूणीने ओरडा केल्यानंतर मोटार चालक तरूणीला कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात सोडून पळून गेला. या मोटार चालकाचे नाव राकेश मिश्रा आहे. त्याच्या मोटारीच्या वाहन क्रमांकावरून पोलिसांनी चालक मिश्राचे नाव शोधले.

कल्याण पूर्व भागात राहणारी तरूणी नवी मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करते. शुक्रवारी ती कामावर गेली होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास खासगी मोटारची नोंदणी करून (कॅब) ती कल्याणमध्ये येत होती. मोटीरीत पीडित तरूणी एकटीच होती. शिळफाटा रस्त्याने मोटार कल्याण पूर्व भागात सूचक नाका भागात येताच चालकाने वाहन थांबवून या तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या तरूणीने ओरडा करताच चालक मोटारीसह पळून गेला.

kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chikhla village missing kid, missing kid neel forest,
भंडारा : ‘नील’ला नेणारा तो ‘हरा मामा’ कोण ? चार दिवसांनंतर रहस्य…
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
arrest one after police thrilling chase of ganja smugglers car
गांजा तस्करांच्या मोटारीचा पोलिसांकडून थरारक पाठलाग; संशयितास पोलीस कोठडी
Leopard Buldhana, Reunion of Mother Leopard ,
बुलढाणा : बिबट माता आणि हरवलेल्या पिल्लाची पुनर्भेट
pune Arguments among rickshaw pullers over passengers at Pune railway station
सुरक्षित रिक्षाप्रवासाची हमी कोण देणार ? त्रस्त प्रवाशांचा सवाल
Image Of Sourav Ganguly And Sana Ganguly.
Sourav Ganguly : सौरव गांगुलीची मुलगी थोडक्यात बचावली, सना गांगुलीच्या कारला बसची धडक

हेही वाचा >>> पलावामध्ये चार वर्षाची बालिका पाचव्या माळ्यावरून पडून गंभीर जखमी

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तरूणीने तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. डोके हे सूचकनाका भागातील सीसीटीव्ही तपासून चालकाचा शोध घेत आहेत. या चालकाच्या अटकेसाठी एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. नोकरदारांनी रात्रीच्या वेळेत खासगी मोटारीत बसण्यापूर्वी संबंधित मोटारीचा वाहन क्रमांक लिहून ठेवावा. चालकाच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.

Story img Loader