ठाणे : भिवंडी येथील गोविंद नगर भागात एका नऊ वर्षीय मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अभय यादव (४०) याला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी भिवंडीतील नागरिक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंद नगर येथील एका इमारतीमध्ये मुलगी तिच्या आई-वडील आणि भाऊ-बहीण यांच्यासोबत वास्तव्यास होती. सुमारे महिन्याभरापूर्वीच ते या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीमध्ये राहण्यास आले होते. मुलीचे आई आणि वडील यंत्रमाग कारखान्यात कामाला आहे. तर भाऊ आणि बहीण परिसरात कामाला जातात. त्यामुळे मुलगी घरात एकटीच असते. गुरुवारी सायंकाळी तिचे वडील घरी आले असता, ती घरात आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु तिचा शोध लागू शकला नाही. त्यांच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणारा अभय हा मुलीला घरी घेऊन जात असतो अशी माहिती परिसरातील मुलांनी दिली. त्यामुळे तिचे वडिल अभयच्या घरी गेले. घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. त्यांनी कडी उघडली असता, त्यांची मुलगी त्याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

हेही वाचा – ठाणे: पर्यटन अर्थार्जनावर पाणी, जिल्ह्यातील प्रमुख निसर्गस्थळांवर जाण्यास पर्यटकांना यावर्षीही मज्जाव

हेही वाचा – ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या

घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने अभय याचा शोध सुरु केला. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास तो एका यंत्रमाग कारखान्याजवळ झोपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A nine year old girl was sexually assaulted and murder shocking incident in bhiwandi ssb