कल्याण जवळील आंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी एका प्रवाशाने एका तिकीट तपासनिसाच्या मानेवर धारदार पातेने वार करुन प्राणघातक हल्ला केला. तपासणीस चपळाईने बाजुला झाला म्हणून ते थोडक्यात बचावले. त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबिवली रेल्वे स्थानक परिसरात इराणी वस्ती आहे. गुन्हेगारांचा अड्डा म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. त्यामुळे या भागात सतत चोऱ्या, हाणाऱ्या, लुटमार सारखे प्रकार सुरू असतात. आंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी सुनील गुप्ता हे तिकीट तपासनिस लोकलमधून येजा करणाऱ्या, फलाटावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तिकीटे तपासत होते. एक प्रवासी तपासणीला चकवा देऊन स्थानका बाहेर जात होता. तपासनिसाने त्याला अडवून तिकिटाची मागणी केली. त्या प्रवाशा जवळ तिकीट नव्हते. परंतु, त्या प्रवाशाने खिशातील तिकीट शोधण्याचा बहाणा करुन अचानक खिशातील धारदार पात बाहेर काढून काही कळण्याच्या आत तपासनिस गुप्ता यांच्या मानेवर वार केले. तपासणीसाने चपळाईने त्या हल्लेखोर प्रवाशाच्या तावडीतून सुटका करुन घेतली.

हेही वाचा: डोंबिवली: ठाकुर्लीतील हनुमान मंदिर रस्ता वाहन कोंडीच्या विळख्यात; सततच्या कोंडीने प्रवासी, विद्यार्थी त्रस्त

वार केल्यानंतर प्रवासी पळून गेला. इतर प्रवाशांनी त्याचा पाठलाग केला तोपर्यंत तो स्थानका बाहेर पळून गेला होता. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. त्या चित्रीकरणाच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी हल्लेखोर प्रवाशाचा शोध सुरू केला आहे. तपासनिस गुप्ता यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलीस या घटनेची माहिती जमा करत आहेत.
कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघाचे रमण तरे यांनी सांगितले, आंबिवली रेल्वे स्थानका परिसरात सतत गुन्हेगारांचा वावर असतो. भिकारी, गुर्दल्ले, मद्दयपी स्थानक परिसरात फिरत असतात.

हेही वाचा: कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही वाढवा, रेल्वे सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलिसांची या भागात सतत गस्त ठेवा म्हणून मागील पाच वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत. त्यामुळे अशाप्रकारचे गैरप्रकार सतत घडतात. दर दोन दिवसाआड आंबिवली स्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल हिसकावून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्या वेळेत आंबिवली स्थानकात गर्दुल्ले ठाण मांडून असतात. त्याचा त्रास सामान्य प्रवाशाला अधिक होतो. ज्या हल्लेखोर प्रवाशाने धारदार पातेने तपासनिसावर वार केला. म्हणजे तो प्रवासी नसून भुरटा चोर असावा. चोरीच्या उद्देशाने तो स्थानकात आला असावा, अशी शक्यता रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी व्यक्त केली.मागील सहा महिन्याच्या कालावधीत आंबिवली स्थानकात फलाटावर रिक्षा आणणे, प्रवाशांना लुटणे असे प्रकार घडले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A passenger attack ticket inspector at ambivali railway station near kalyan crime news tmb 01