कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टी परिसरात एका व्यक्तीने भांडणादरम्यान चाकूने वार करून एकाला गंभीर जखमी केले आहे. तर भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या एकाला ठार केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या प्रकरणी मुनीरूळ शेख(३३) याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हेही वाचा >>>भिवंडीत १८ महिन्याच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी पालिका उपअभियंता, ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल
कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टी परिसरात मुनीरूळ शेख राहतो. त्याच परिसरात राहणारे सुरज शेख(३१) यांच्याशी मुनीरूळ याचे काही कारणावरून भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून मुनीरूळ याने सूरज यास शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रस्त्यात अडविले. यावेळी त्या दोघांचे पुन्हा भांडण झाले. या भांडणादरम्यान मुनीरूळ याने सुरजच्या पोटात चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ओमप्रकाश तिवारी(४२) यांच्या छाती आणि पोटावर वार केले. या हल्यात तिवारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर झालेले सूरज शेख यांच्यावर कळव्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी मुनीरूळ शेख याला अटक केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.