भाईंदर : भाईंदर रेल्वे स्थानाकाबाहेरील एका जुन्या इमारतीचा भाग कोसल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीनजण जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन दिवसांपासून मीरा भाईंदर शहरात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या नवमूर्ती इमारतीचा एका बाजूकडील पहिला माळा कोसळल्याची घटना घडली. घटनास्थळी पालिकेच्या अग्निशमन विभागाने पोहोचून बचावकार्य सुरू केले. त्यामुळे त्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. परंतु यात एका दुकान विक्रेत्याचा पाय मोडला गेला असून दोनजण जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हेही वाचा – ठाणे: घोडबंदर मार्गावरून शक्य असल्यास वाहतूक टाळा

इमारत ३५ वर्षे जुनी असल्यामुळे तिला मोकळे करून पाडण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A portion of an old building near bhayandar railway station collapsed injuring three ssb
Show comments