शरीरावर राखाडी तपकिरी गडद ठिपणे असलेला आणि पाठीवर पटकोनी खुणा असलेल्या दुर्मिळ तपकिरी रंगाचा हरणटोळ बदलापुरात आढळला आहे. सर्पमित्रांच्या सहाय्याने वन विभागाने या सापाची निसर्गमुक्तता केली. बदलापुरच्या पूर्व भागात हा साप आढळून आला होता.

हेही वाचा >>>त्या वणवा प्रतिबंध तंत्राला वनश्री पुरस्कार; सगुणा वनसंवर्धन तंत्राचा गौरव, पालकमत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी

गेल्या आठवड्यात बदलापुरातील क्षेत्रीय वन कार्यालयातर्फे एका दुर्मिळ सापाला निसर्गमुक्त केले. बदलापुरातील पूर्व भागात अश्वमेध प्रतिष्ठानचे विवेक पोतदार, स्वप्नील मेहेर, परेश पानसरे आणि मनीष फुलपगारे यांना हा तपकिरी हरणटोळ आढळला. त्यांनी याबाबतची माहिती बदलापुरच्या वन विभागाला दिली. बदलापुरचे वनक्षेत्रपाल विवेक नातू यांनी या सापाला ताब्यात घेत त्याची जंगलात मुक्तता केली. हा साप दुर्मिळ असून त्याला तपकिरी हरणटोळ म्हणून ओळखले जाते, अशी माहिती ठाण्याचे मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. याची सरासरी लांबी १५० सेंटीमीटर अर्थात सुमारे पाच फुट इतकी असते. राखाडी-तपकिरी शरीरावर गडद तपकिरी ठिपके आणि पाठीवर पटकोनी खुणा असतात.

हेही वाचा >>>ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प महिनाअखेरीस होण्याची चिन्हे; अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात 

डोक्यावर तपकिरी रेषा आणि तोंडाचा पुढील भाग हा हिरव्या हरणटोळाच्या मानाने लांब व चपटा असतो. टोकदार तोंड, लांबट आणि सडपातळ शरीर या सापाचे असते. हा साप लहान पक्षी, पाली, उंदीर आणि झाडांवरील बेडूक यांना आपले भक्ष्य करतो. हा साप पश्चिम घाटात जास्त आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी आढळतो, असेही हरड यांनी सांगितले आहे.