कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिका हद्द आणि उल्हासनगर पालिका हद्दीतील आशेळे-माणेरे गावांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटून एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वासू राम वच्छानी (७०) असे अपघातात गंभीर जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. वासू वच्छानी हे कल्याणकडून उल्हासनगरकडे दुचाकी वरुन जात होते. आशेळे माणेरे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. हे खड्डे चुकवित जात असताना त्यांची दुचाकी एका खड्ड्यात जोरात आपटली. तोल गेल्याने वासू वच्छानी जोराने दुचाकीसह रस्त्यावर पडले. दुचाकी अचानक पायावर पडल्याने आणि रस्त्यावरील खडीचा मार बसल्याने वासू यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पादचाऱ्यांनी त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आशेळे-माणेरे भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत म्हणून या भागातील रहिवासी दररोज कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी करत आहेत. हा विभाग डोंबिवली बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. भोगोलिक दृष्ट्या हा विभाग कल्याण पूर्व बांधकाम विभागाच्या अंतर्गत न देता तो डोंबिवलीत विभागात टाकल्याने अधिकारी नाराजी व्यक्त करतात. प्रत्येक वेळी आशेळे भागातील रहिवाशांना डोंबिवलीला येणे शक्य होत नाही, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद

आशेळेचा रस्ता कडोंमपा की उल्हासनगर पालिका हद्दीत असाही वाद याठिकाणी आहे. त्यामुळे कडोंमपा आणि उल्हासनगर या दोन्ही पालिका या महत्वपूर्ण वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे, त्याची देखभाल करण्यास टाळाटाळ करत आहेत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. मागील सात वर्षापासून खराब रस्त्याचे दुष्टचक्र आमच्यामागे लागले आहे, असे रहिवासी सांगतात. वासू यांच्या अपघातामुळे तरी कडोंमपाने या भागातील खड्डे बुजवावेत अशी रहिवाशांची मागणी आहे. डोंबिवली बांधकाम विभागाच्या अभियंत्याने या भागातील खड्डे बुजविण्याची कामे हाती घेतली आहेत. लवकरच आशेळे माणेरे रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे असे सांगितले.

गेल्या महिन्यात कल्याण पश्चिमेत टिळक चौक येथे सनदी लेखापाल रवींद्र पै, गणेश सहस्त्रबुध्दे खड्ड्यात पाय मुरगळून जखमी झाले होते. आता ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पडून जखमी होण्याची ही तिसरी घटना आहे.