कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिका हद्द आणि उल्हासनगर पालिका हद्दीतील आशेळे-माणेरे गावांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटून एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वासू राम वच्छानी (७०) असे अपघातात गंभीर जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. वासू वच्छानी हे कल्याणकडून उल्हासनगरकडे दुचाकी वरुन जात होते. आशेळे माणेरे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. हे खड्डे चुकवित जात असताना त्यांची दुचाकी एका खड्ड्यात जोरात आपटली. तोल गेल्याने वासू वच्छानी जोराने दुचाकीसह रस्त्यावर पडले. दुचाकी अचानक पायावर पडल्याने आणि रस्त्यावरील खडीचा मार बसल्याने वासू यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पादचाऱ्यांनी त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा