येथील मीनाताई ठाकरे चौकाजवळील आंबेघोसाळे तलावाजवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून या मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक राजन सामंत यांचे निधन
जैहद अजहर शेख (७ ) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो राबोडीतील अपना नगर भागात राहत होता. शुक्रवारी सांयकाळी हा मुलगा आंबेघोसाळे तलावाजवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील पाण्यात पोहण्यासाठी उतरला. त्यावेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत राबोडी पोलिसांनी धाव घेतली. या मुलाचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.