उपवन भागात एका भरधाव ऑडी मोटार भटक्या श्वानाच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. या मोटार चालकाला चार जणांनी रोखले असता, त्यांनाही धडक देण्याचा त्याने प्रयत्न केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे: साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

उपवन येथे रात्री भटके श्वान रस्त्याकडेला झोपले होते. त्याचवेळी भरधाव आलेली मोटार त्याच्या अंगावरून गेली. त्याचवेळी याच परिसरातून चार जण जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्याने त्या मोटार मालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. पंरतु तो मोटारीने पुढे गेला. त्यानंतर पुन्हा त्याने विरुद्ध दिशेने वाहन चालवून या चार जणांना धडक देण्याचा प्रयत्न करून पळ काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A stray dog died after a speeding audi car ran over it in upavan area amy