डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागात मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थ्याला जुन्या वादातून चार तरुणांनी खंबाळपाडा येथील बालाजी आंगण सोसायटीच्या समोर लाथाबुक्के, लोखंडी कड्याने सोमवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.विद्यार्थ्याच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत मिनी बसने रिक्षा, दुचाकीला दिली धडक; तीन विद्यार्थी जखमी

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

राहुल यादव (रा. कपील वास्तू, ठाकुरवाडी, डोंबिवली पश्चिम) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विजय गुप्ता, आवेश उर्फ सय्यद पटेल आणि त्याचे दोन मित्र अशी आरोपींची नावे आहेत.राहुल ठाकुर्ली भोईरवाडी येथील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याची परीक्षा सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी पेपर संपल्यानंतर तो घरी पायी जाण्यास निघाला. तो एकटाच मंजुनाथ महाविद्यालय ते बालाजी आंगण सोसायटी रस्त्याने ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे पायी निघाला होता. यावेळी त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या आरोपी विजय गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदार विद्यार्थी राहुल याला अडविले.

हेही वाचा : ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांकरिता नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली विश्रामगृह

जुन्या भांडणाचा राग उकरुन काढून त्याच्या बरोबर वाद घालून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. विजय, आवेशने राहुलला जमिनीवर पाडून लाथाबुक्के, हातांनी बेदम मारहाण केली. तर सय्यद पटेलने हातामधील पितळी कड्याने राहुलच्या डोक्यावर बुक्के मारले. त्यामुळे राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राहुल एकटाच असल्याने आणि हे भांडण सोडविण्यासाठी कोणीही पादचारी मध्ये न पडल्याने राहुलला चार जणांनी १० ते १५ मिनिट मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले. राहुलने हा प्रकार मोबाईलवरुन घरी सांगितला. त्यानंतर कुटुंबीय आणि राहुल यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.