डोंबिवली एमआयडीसीतील ओमकार इंग्लिश शाळेच्या प्रवेशद्वारावर एका सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यांला तेवढ्याच वयाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने आणि त्याच्या वडील आणि भावाने बेदम मारहाण केली आहे.

मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सचिन गोंजारे (१६, रा. ओम सप्तशृंगी सोसायटी, मुंब्रा देवी, दिवा पूर्व) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
44 students of class 5 to 6 of Thane Municipal School found to have poisoned by midday meal
दिव्यामधील महापालिका शाळेतील ४४ विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळेतून देण्यात येणाऱ्या खिचडीत मृत पाल आढळली
pune police open murder case on courier delivery
कुरिअरच्या डिलिव्हरीवरून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Sandalwood theft in a society on Law College Road
विधी महाविद्यालय रस्त्यावरील सोसायटीत चंदन चोरी, चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढीस
Clashes erupted between supporters of BJP leader Munna Yadav and his relative Balu Yadav
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; आधी आंघोळीचा व्हिडीओ बनवला नंतर…
youth congress taluka president rape
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र

पोलिसांनी सांगितले, ओंकार इंग्लिश शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर तक्रारदार साहिल गोंजारे उभा असताना, तेथे एका सोळा वर्षाचा अल्पवयीन विद्यार्थी आला. त्याने साहिलला ‘तू मला काल शिव्या का दिल्यास,’ असा प्रश्न करून बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. साहिलचा मोबाईल हिसकावून तो गटारात फेकून दिला. आरोपी विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना फोन करून शाळे जवळ बोलावले. वडील आणि भाऊ दोघे आल्यानंतर त्यांनी साहिलला मुलाला शिव्या का देतोस असा प्रश्न करून वडिलांनी त्याला हाताने मारहाण केली. आरोपी विद्यार्थ्याच्या भावाने एका लाकडी फळीने साहिलला बदडून काढले. साहिल एकटाच असल्याने तो या तिघांचा प्रतिवाद करू शकला नाही.

घडलेली घटना साहिलने घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या पुढाकाराने साहिलने आरोपी विद्यार्थी वडील आणि भावाविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.