मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी ३० हजार जणांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे येथील शिवसेना हिंदूगर्वगर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंकडून नव्या नेमणुका ; किशोर पाटील यांची बदलापूर शहरप्रमुखपदी निवड
शिवसेनेत उभी फूट पडली असताना ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास परवानगी मिळाली आहे. तर शिंदे गटही बीकेसीला दसरा मेळावा घेणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी ठाण्यातील शिवसेना हिंदूगर्वगर्जना या कार्यक्रमात म्हस्के म्हणाले की, ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून ३० हजार जणांचेह लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासंदर्भात नगरसेवकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. असेही म्हस्के म्हणाले.