कल्याण : टिटवाळा येथील शकंतुला विद्यालयातील एका शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला छडीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत या विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारी वरुन टिटवाळा पोलिसांनी शिक्षके विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया सिंग असे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. तपास करुन या शिक्षके विरुध्द कायदेशीर केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी शाळा सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यामधून एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला शिवी दिली. शिवी दिल्याने संतप्त विद्यार्थ्याने शिक्षिका प्रिया सिंग यांना घडला प्रकार सांगितला.

हेही वाचा : कल्याण ग्रामीणचे रस्ते धनाढ्य विकासकांच्या सोयीसाठी ; मनसे आ. प्रमोद पाटील यांची टीका

शिक्षिकेने दोन्ही विद्यार्थ्यांना समोरासमोर बोलावून त्यांच्याकडून घडल्या घटनेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर शिवी देणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिका प्रिया सिंग यांनी छडीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा : सजावट, पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरांत वाढ

घरी गेल्यानंतर मुलाने आई, वडिलांना घडला प्रकार सांगितला. शिक्षिकेच्या कृती बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मुलाच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. शासन आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A teacher brutally beat up a student in titwala kalyan tmb 01
Show comments