ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील एका न्यायबंद्याने सँडेलच्या सोलमधून मोबाईल आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायबंद्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंदीवान आहेत. तसेच अनेक मोठे कैदी देखील या कारागृहात आहेत. ३० डिसेंबरला कारागृहातील झडती पथक बॅरेक क्रमांक तीनमध्ये झडती घेत होते. या बॅरेकमध्ये २०० न्यायबंदी होते. झडती घेत असताना बॅरेकमधील भिंतीवर खिळ्याला अडकविलेली पिशवी होती. या पिशवीत सँडेलचा जोड ठेवल्याचे झडती पथकाला आढळले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी सँडेलचे वजन तपासले. यातील डाव्या पायातील सँडेल उजव्या पायातील सँडेलपेक्षा जास्त वजनाचा आढळून आला. पथकाला संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठांच्या आदेशानंतर सँडलचे सोल काढले असता, त्यामध्ये एक मोबाईल आढळून आला.

हेही वाचा >>>प्रदूषण परिस्थितीची लपवा छपवी

मोबाईलची तपासणी प्रशासकीय विभागात करण्यात आल्यानंतर मोबाईल बंद अवस्थेत होते. तसेच त्यामध्ये सीमकार्डही नव्हते. पथकाने मोबाईलबाबतची माहिती घेतली असता, हा मोबाईल प्रथमदर्शनी काशिमीरा पोलीस ठाण्यातील एका प्रकरणामधील न्यायबंदी असल्याचे समोर आले. हा न्यायबंदी सप्टेंबर २०२३ पासून कारागृहात आहे. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २४५ तसेच कारागृह कायदा १८९४ कलम ४२, ४५ (१२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.