कल्याण पश्चिमेतील रहेजा गृहसंकुलात रविवारी दुपारी चोरी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्यांपैकी एका चोरट्याला रहिवाशांनी पकडले. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या चोरट्याने आपण रहिवाशांनी केलेल्या मारहाणीत खूप गंभीर जखमी झालो आहोत असा आव आणून बेशुध्द पडल्याचे ढोंग घेतले आणि तेथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर पाळत ठेवली.पोलीस आपल्या पासून दूर जात नाहीत हे पाहून बेशुध्द पडल्याचे ढोंग घेतलेल्या चोरट्याने एक तासानंतर तहान ालागल्याने हालचाल सुरू केली. तगडा चोरटा बेशुध्द कसा काय पडू शकतो, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. शुध्दीवर आल्याचे नाटक करताच डाॅक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार करुन त्याला पोलिसांच्या हवाली केले.

हेही वाचा >>>ठाणे : मी ट्रेलर म्हणून काम करतो तर, मुख्यमंत्री आल्यावर पिक्चर सुरू होतो ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत

Drunk driver hits police constable incident in Kalyaninagar area
मद्यपी वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर भागातील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sandalwood thief who attacked the police in Deccan area arrested
डेक्कन भागात पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेला चंदन चोरटा गजाआड
A large stockpile of swords koyta seized in Akkalkot crime news
अक्कलकोटमध्ये तलवारी,कोयत्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
murder on suspicion of mobile phone theft, suspicion of mobile phone theft,
भिवंडीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाची हत्या, शांतीनगर पोलिसांनी केली सातजणांना अटक
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त
Police fired on sandalwood thieves
विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार
satara crime news
सातारा: रक्कम लांबविण्याचा बनाव पोलिसांकडून उघडकीस

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रहेजा संकुलातील काही रहिवासी फिरायला गेले असतील. ज्या घराचा दरवाजा बंद आहे ते घर फोडून तेथून ऐवज लंपास करायचा असा विचार करुन तीन चोरटे रविवारी दुपारी रहेजा संकुलात शिरले. आपण संकुलातील नातेवाईकांच्या घरी चाललो आहोत असे दाखवून त्यांनी संकुलात प्रवेश केला. हे तीन जण संकुलात येत असतानाच काही रहिवाशांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या.
संकुलात आल्यानंतर त्यांनी एका घराचे कुलुप चोरीसाठी तोडले. तेवढ्यात त्या संकुलातील रहिवाशांना घराबाहेर तोडल्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. त्यावेळी तीन जण संकुलात वावरत होते. रहिवाशांनी तीन जणांना तुम्ही कोणाकडे आले आहोत. तुम्ही येथे काय करता, असे प्रश्न करताच ते समाधानकारक उत्तर देेऊ शकले नाहीत. हे चोरटे आहेत हे लक्षात येताच रहिवाशांनी तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. एक जण रहिवाशांच्या तावडीत सापडला. त्याला चोप देत रहिवाशांनी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या ताब्यात देताच चोरट्याने आपण खूप गंभीर असल्याचे, बेशुध्द झाल्याचे नाटक करुन पोलीस, रहिवाशांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ढोंगबाज चोरट्याला पोलिसांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तेथे कोणीही नसेल तेथून आपण पळून जाऊ असा चोरट्याचा इरादा होता. परंतु पोलिसांनी त्याच्या खोली भोवती कडे केले होते. एक तास चोरट्याने कोणतीही हालचाल न करता खूप बेशुध्द असल्याचे दाखवून झोपून राहण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत पोलीस बाजुला झाले की आपण पळून जाऊ असा त्याचा बेत होता. एक तास उलटुनही पोलीस जागेचे हटत नाहीत पाहून चोरट्याने वळवळ सुरू केली. त्याने पाणी मागितले. ते त्याला देण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो ठीक असल्याचे दिसून आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन रुग्णालयातून त्याला सोडण्यात आले. प्राथमिक तपासणीत तो दिल्ली येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा >>>‘मुंब्रा रेतीबंदर खाडी किनारी भरणी’; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

या चोरट्यांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत. याचा तपास पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आता दिवाळीचा हंगाम सुरू होईल. या कालावधीत अनेक नागरिक सणा निमित्त गावी, फिरायला जातात. अशा भुरट्या चोऱ्या या कालावधीत वाढतात. त्यामुळे संकुलात नवीन अनोळखी व्यक्ति आढळल्या तर त्यांची विचारपूस करुन मगच त्यांना आवारात प्रवेश द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.