लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पश्चिम महात्मा गांधी रस्त्यावरील भावे सभागृहाजवळून पायी जात असताना एका ७० वर्षाच्या महिलेला एका तरुणाने बुधवारी दुपारी ढकलून दिले. महिला रेल्वे जिन्यावर पडताच तिच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज तरुणाने लांबिवला.

Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
journalists were murdered or killed last year
सत्तेला प्रश्न विचारताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला…
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

सुवर्णा अनिल नेवगी (७०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पूर्वेतील पेंडसेनगर भागात राहतात. बुधवारी दुपारी त्या डोंबिवली पश्चिमेत बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. त्या गणेश मंदिराजवळील रेल्वे पुलावरुन पश्चिम भागात आल्या होत्या. खरेदीनंतर त्या पुन्हा भावे सभागृहाजवळून रेल्वे पुलावरुन पूर्व भागात घरी चालल्या होत्या.

हेही वाचा… ठाण्याच्या खाडीतील झोपड्यांवर पालिकेची कारवाई; ६५ झोपड्या पालिकेने तोडल्या

रेल्वेचा जिना चढत असताना अचानक पाठीमागून आरोपी नितीन पांडुरंग ठाकरे (२६, रा. दुगाड, भिवंडी) आला. त्याने सुवर्णा यांना पाठीमागून जोराने ढकलून दिले. त्या जिन्यावर पडल्या. जिन्याच्या पायऱ्यांची लोखंडी धारदार टोके त्यांच्या पायाला, मानेला लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे. जिन्यावर पडताच आरोपी नितीनने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज लांबविला. विष्णुनगर पोलीस ठाण्यात सुवर्णा नेवगी यांनी तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. के. आंधळे तपास करत आहेत.

Story img Loader