भगवान मंडलिक
कल्याण- दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेेनेतून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या शिवसेनेच्या दरीमध्ये न अडकता, पहिल्या दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या कल्याणातील ज्येष्ठ आक्रमक शिवसैनिक आणि महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सार्वजनिक गणशोत्सवाच्या देखाव्यातून शिवसेनेच्या स्थापनेपासुनचे आत्मनिवेदन शिवसेनारुपी एका महाकाय वटवृक्षाच्या माध्यमातून साकरले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावातून जाणार बुलेट ट्रेन, पालिकेने नागरीकांकडून मागवल्या हरकती-सूचना

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

विजय तरुण मंडळाच्या माध्यमातून मुरबाड रस्त्यावरील रामबाग भागात हा देखावा भव्य मंडपावर साकारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून ते दोन महिन्यापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवसेना आमदारांपर्यंतचे कथन भारदस्त आवाज, प्रखर नेत्रपल्लवीतून वटवृक्षाच्या खोडाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. या मंडळाचे महानगर प्रमुख विजय साळवी विश्वस्त आहेत.शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसैनिकांची कोणत्या गटात दाखल व्हायचे म्हणून तारांबळ उडाली. पण कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांनी पहिल्या दिवसांपासून बंडखोर आमदारांसंदर्भात आक्रमक भूमिका घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्धार जाहीर केला. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर शाब्दिक टीका केली. त्यांची ही भूमिका आणि मागील दोन महिन्यापूर्वी घडलेले शिवसेनेतील बंडखोरीचे नाट्य यामुळे अस्वस्थ असलेल्या विजय साळवी यांनी आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून शिवसेनारुपी महाकाय वृक्षाचे महत्व आणि हा महाकाय वृक्ष परिपक्व झालेला असताना त्याच्या पारंब्या ओढण्यासाठी राजकीय व्यापाऱ्यांची सुरू असलेली धावाधाव यावर देखाव्यातून प्रखर भाष्य, शाब्दिक आसुड ओढले आहेत.

शिवसेनेतून फुटून काही लोक बाहेर पडले असले तरी येणाऱ्या काळात शिवसेनेचा डंका कसा राज्यभर गाजणार आणि वाजणार आहे. याची महती गणेश भक्तांना सांगण्यात आली आहे. आत्मनिवेदन करणाऱ्या वटवृक्षातील मानवी डोळे, ओठ यांच्या हालचाली तांत्रिक, यांत्रिक पध्दतीने जुळविण्यात आल्या आहेत. पाच मिनिटांचे हे कथन आहे. शिवसेनेचे हे आत्मनिवेदन सध्या शहरातील चर्चेला विषय झाला आहे.

हेही वाचा >>> कल्याण : वाहतूक पोलिसाला ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला दोन वर्षाचा कारावास

मी शिवसेना बोलते….
‘मी प्रबोधनकारांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून निर्माण झाले आहे. उध्दव ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सारख्या अनेकांनी कठोर परिश्रम घेऊन मला वाढविले आहे. त्यामुळे माझा महावृक्ष झाला आहे. हे घडत असताना अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अनेकांनी रक्त सांडले आहे. काहींनी कारावास भोगला आहे.

अनेक दिग्गजांनी मला वाढविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मुळांमुळे घडले आहेत. घडत आहेत. शिवसेनारुपी या महाकाय वटवृक्षावर आता फळे लगडली आहेत. ही फळे परिपक्व झाल्याचे दिसताच, आता इतर राजकीय पक्षांचे व्यापारी, पुढारी फळांचा भाव करुन माझ्या पासून हिरावून नेत आहेत. त्या व्यापाऱ्यांना शिवसेनारुपी महाकाय वटवृक्ष सांगू इच्छितो, की शिवसैनिक रुपी घट्ट मुळांवर हा महाकाय वृक्ष घट्ट पाय रोवून अखंडपणे उभा राहणार आहे. माझ्याशी गद्दारी करणाऱ्यांना मी गाडून टाकणार आहे.
हे गणराया, माझ्या शिवसैनिकांना या स्वार्थी गद्दारांशी लढण्याचे बळ दे आणि मला स्वार्थी मतलबी लोकप्रतिनिधी रुपी वादळाशी लढण्याची शक्ती दे.’ असा वटवृक्षातील शिवसेना रुपातील मानव गणेश मंडपात भक्तांशी संवाद साधत आहे.