डोंबिवलीत तशी निसर्गसौंदर्य केंद्रे कमीच! प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या येथील नागरिकांना ताज्या हवेत रमण्यासाठी बाहेरचाच रस्ता पकडावा लागतो. पण डोंबिवलीतील अशी काही ठिकाणे आहेत की जिथे निसर्गसौंदर्य खुलून येते. रेतीबंदर येथील खाडीकिनारा, कुंभारखाणपाडा येथील नवी चौपाटी, सावळाराम क्रीडा संकुल, भोपर टेकडी ही त्यापैकी काही उदाहरणे. डोंबिवली पूर्वेला भोपर गावात असलेली टेकडी म्हणजे डोंबिवलीकरांचे फिरण्याचे हक्काचे ठिकाण. टेकडीवरील गावदेवी मंदिर आणि परिसरातील रमणीय देखावा यामुळे भोपर टेकडी प्रेक्षणीय स्थळ झाले आहे.
भोपर हे गाव अनेकांना माहीत असेल, पण भोपरच्या टेकडीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. डोंबिवलीच्या आधी येणाऱ्या कोपर स्थानकातून ही टेकडी दिसते. संध्याकाळी प्रसन्न वातावरणात फिरण्याचे आणि सकाळी फेरफटका मारण्याचे हे एक उत्तम स्थान आहे. तब्बल पन्नासेक पायऱ्या चढून गेल्यानंतर या टेकडीवर जाता येते. टेकडीवर गाडीने जाण्यासाठी दुसऱ्या बाजूने थेट रस्ता काढण्यात आलेला आहे. टेकडीवर गावदेवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिरात देवीचा चांदीचा मुखवटा आहे, तर मंदिराच्या चहूबाजूने बगिचा फुलविण्यात आला आहे. विविध प्रकारची रोपे आणि फुलझाडे येथे लावण्यात आलेली आहेत.
टेकडीवर आल्यावर डोंबिवली आणि परिसराचे चहुबाजूने विहंगम दर्शन होते. मंदिराच्या बाजूला टेकडीवर सपाट जागा आहे. जणू एखाद्या पठारासारखीच. याला बरेच जण भोपर टेकडीवरील पठारच बोलतात. या पठारावर भोपरच्या ग्रामस्थांनी फिरस्त्यांसाठी सुंदर सोय केली आहे. बेंच, सिमेंटचे चौथरे आणि दिवाबत्तीची सोय येथे करण्यात आली असून या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या टेकडीचे वैशिष्टय़ म्हणजे येथून डोंबिवली, दिवा, कल्याण-शिळ रोड अगदी मुंब्य्रापर्यंतचा परिसर दिसतो. दूरवर पसरलेली हाजीमलंग डोंगराची रांग मोहक दिसते. टेकडीच्या एका बाजूने पारसिकचा डोंगर आणि मुंब्रा देवीचे मंदिर दिसते. पावसाळय़ात या डोंगररांगा हिरवाईने नटलेल्या असतात, त्यामुळे हा परिसर टेकडीवरून खूपच रमणीय दिसतो. डोंबिवली शहराचा विस्तार, मुंब्रा-कौसा भाग, कल्याण-शिळ रोड, कोपर रेल्वे स्थानक व कल्याणची खाडी यांचे विहंगम दृश्य पाहायचे असेल तर भोपर टेकडीशिवाय दुसरी जागा नाही.
विशेष म्हणजे मॉर्निग वॉक करण्यासाठी वा सकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या टेकडीवर येतात. सकाळी वातावरण प्रसन्न असते आणि हवेतही गारवा असतो. अशावेळी मन प्रसन्न करण्यासाठी या टेकडीवर येण्याचा बहुतेकांचा मानस असतो. एखादी संध्याकाळही या ठिकाणी झकास जाऊ शकते. येथील सृष्टिसौंदर्याचा आनंद घेत तुमची संध्याकाळ रमणीय होऊ शकते.

Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Sale of Jagannath Baba Sansthans land without permission Former MLAs allege against Mahavikas Aghadi candidate
वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

भोपर टेकडी, डोंबिवली

कसे जायचे?
डोंबिवली स्थानक परिसरातून भोपर गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. मानपाडा रोडला जाणारी रिक्षा पकडल्यास शनिमंदिराजवळ भोपर गावात जाणारा रोड आहे. येथे उतरून चालत गावातील टेकडीपर्यंत जाता येते.
कल्याण-शिळ रोडवर मानपाडा सर्कलला उतरल्यास तेथून रिक्षाने भोपर गावात जाता येते.