डोंबिवलीत तशी निसर्गसौंदर्य केंद्रे कमीच! प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या येथील नागरिकांना ताज्या हवेत रमण्यासाठी बाहेरचाच रस्ता पकडावा लागतो. पण डोंबिवलीतील अशी काही ठिकाणे आहेत की जिथे निसर्गसौंदर्य खुलून येते. रेतीबंदर येथील खाडीकिनारा, कुंभारखाणपाडा येथील नवी चौपाटी, सावळाराम क्रीडा संकुल, भोपर टेकडी ही त्यापैकी काही उदाहरणे. डोंबिवली पूर्वेला भोपर गावात असलेली टेकडी म्हणजे डोंबिवलीकरांचे फिरण्याचे हक्काचे ठिकाण. टेकडीवरील गावदेवी मंदिर आणि परिसरातील रमणीय देखावा यामुळे भोपर टेकडी प्रेक्षणीय स्थळ झाले आहे.
भोपर हे गाव अनेकांना माहीत असेल, पण भोपरच्या टेकडीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. डोंबिवलीच्या आधी येणाऱ्या कोपर स्थानकातून ही टेकडी दिसते. संध्याकाळी प्रसन्न वातावरणात फिरण्याचे आणि सकाळी फेरफटका मारण्याचे हे एक उत्तम स्थान आहे. तब्बल पन्नासेक पायऱ्या चढून गेल्यानंतर या टेकडीवर जाता येते. टेकडीवर गाडीने जाण्यासाठी दुसऱ्या बाजूने थेट रस्ता काढण्यात आलेला आहे. टेकडीवर गावदेवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिरात देवीचा चांदीचा मुखवटा आहे, तर मंदिराच्या चहूबाजूने बगिचा फुलविण्यात आला आहे. विविध प्रकारची रोपे आणि फुलझाडे येथे लावण्यात आलेली आहेत.
टेकडीवर आल्यावर डोंबिवली आणि परिसराचे चहुबाजूने विहंगम दर्शन होते. मंदिराच्या बाजूला टेकडीवर सपाट जागा आहे. जणू एखाद्या पठारासारखीच. याला बरेच जण भोपर टेकडीवरील पठारच बोलतात. या पठारावर भोपरच्या ग्रामस्थांनी फिरस्त्यांसाठी सुंदर सोय केली आहे. बेंच, सिमेंटचे चौथरे आणि दिवाबत्तीची सोय येथे करण्यात आली असून या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सहज सफर : डोंबिवलीचा विहंगम नजारा!
पर हे गाव अनेकांना माहीत असेल, पण भोपरच्या टेकडीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे.
Written by संदीप नलावडे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-01-2016 at 01:48 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A visit to bhopar tekdi mandir dombivli