ठाणे: रेल्वे स्थानकावरील स्टाॅल निविदेच्या माध्यमातून मिळवून देतो अशी बतावणी करत एका महिलेने चार जणांची १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फसवणूक झालेले व्यक्ती हे ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ भागातील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओळख एका व्यक्तीसोबत झाली होती. आपण रेल्वेत अभिंयता असून त्यांची वेदांत सर्व्हिस या नावाने कंपनी आहे. रेल्वेत निविदेच्या माध्यमातून वेगवेगळे स्टाॅल मिळवून त्याद्वारे व्यवसाय करू असे त्यांनी चारजणांना सांगितले. त्यामुळे चारही जणांनी त्यांना निविदेची रक्कम भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे देण्यास सुरूवात केली. परंतु मे महिन्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे व्यवहार पाहण्यास सुरूवात केले. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी त्यांच्या पत्नीला पैसे देण्यास सुरूवात केली.

हेही वाचा… डोंबिवलीतील बालकाच्या हत्या प्रकरणातील मोक्काचे आरोपी निर्दोष; पोलिसांनी तपासात त्रृटी ठेवल्याचा न्यायालयाचा ठपका

काही दिवसांनी फसवणूक झालेले व्यक्ती त्यांचे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. काही दिवसांनी कंपनी कार्यालय बंद असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चारही जणांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman cheated four people by pretending to get a stall at the railway station through a tender in thane dvr
Show comments